आमची चळवळ कशावर आधारित असावी ? 'रिपब्लीकन की बहुजन' ?
आमची चळवळ कशावर आधारित असावी? कोणत्या बॅनरखाली आम्ही व्यवस्थापरिवर्तनाची चळवळ उभी करणार आहोत? ''रिपब्लिकन की बहुजन?" निश्चित्तच 'रिपब्लीकन' ही आमची चळवळ आहे.आता काहींना प्रश्न पडेल की, बुद्ध तर 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय' म्हणतात.मग बुद्ध काय चुकीचे बोलले होते ?
नाही; बुद्ध चुकीचे बोलत नसतात.तो मुर्ख असेल, जो बुद्धाच्या वचनावर आपली विद्वत्ता दर्शवेल! परंतू बुद्धाचा ' बहुजन ' शब्द दु:खावर आधारीत होता. बुद्धाचा बहुजन शब्द आजच्या जाती - वर्णावर आधारीत नव्हता. तथागताचे म्हणणे एवढेच होते की बहुतांशी लोक दु:खी आहेत.त्या दु:खी जनतेच्या सुखासाठी त्याचा धम्म आहे.बुद्धाचा बहुजन शब्द राजकारणात जातीचे राजकारण करनण्यासाठी नव्हता. तो आजच्या सारखा 85% महार,मांग,चांभाराच्या,तेली,कुणबी,माळी,इत्यादींच्या राजकारणासाठी नव्हता. बुद्धाच्या बहुजन शब्द्द कुणाचा द्वेष शिकविण्यासाठी नव्हता.जसे आजचे कांशिरामभक्त,वामनभक्त करतात. बुद्धाच्या काळातील राजांचे राज्य आणि त्यांची राजकीय व्यवस्था पाहीली तर ती रिपब्लीकन संकल्पनेवर आधारीत होती.स्वत: बुद्ध विसाव्या वर्षी संघाचा सदस्य झाला होता.तेव्हा संघात घेतले जाणारे निर्णय रिपब्लीकन पद्धतीने घेतले जात होते. बुद्धाच्या काळात आणि बुद्ध-धम्म स्विकारणाऱ्या सम्राट अशोकाच्या काळात रिपब्लीकन शासनप्रणाली होती.
बाबासाहेबांना रिपब्लीकन म्हणजे जनतेची शासनप्रणाली मंजूर होती.ूनच त्यानी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा जातीय आधारीत पक्ष विसर्जीत करुन सर्व भारतीय समावेशक "रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया" या पक्षाची स्थापना करनण्याचे योजले होते.बाबासाहेबांची चळवळ ही कुण्या महार,मांग,चांभार, कुणबी ,इत्यादी जातींना जोडण्यासाठी नव्हती, तर भारतातील शोषीत जनतेला त्यांचे हक्क प्राप्त करुन देण्यासाठी होती.त्यामध्ये मग सर्वच येतात.
त्यामुळे आज जेही जातीय आधारावर राजकारण करीत आहेत, ते सर्व बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहेत!
मग ,असे कोण आहेत जे बाबासाहेबांचा रिपब्लीकन पक्ष सोडून जातीय आधारीत बहुजन थेअरी वर आपले पक्ष उघडून बसले आहेत? तर ते आहेत बी.एस.पी.,बामसेफ,एंबस आणि इतर बहुजन पक्ष.
बाबासाहेबांच्या तळपायाची बरोबरी या पक्षातील कोणतेच नेते करु शकत नाहीत. बाबासाहेब विद्वान होते.नाहीतर त्यांनी 'रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया' नावाचा पक्ष काढण्याऐवजी 'बहुजन पार्टी ऑफ इंडिया' नावाचा पक्ष काढला असता.
मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे म्हणून मी रिपब्लीकन आहे.
आणि तुम्ही ?